नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर... (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूक90s Deadliest Villain Mahesh Anand: नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर काहींसोबत लिव्ह इन रिलेशन, शेवटी मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला

90s Deadliest Villain Mahesh Anand: महेश आनंद हे 90 च्या दशकातील सर्वात भयानक खलनायकांपैकी एक. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं.

By : नामदेव जगताप|Updated at : 12 May 2025 09:43 AM (IST)

नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर... (1)

90s Deadliest Villain Mahesh Anand

Source :

ABP Majha

90s Deadliest Villain Mahesh Anand: चित्रपट हिरोमुळे गाजतो, हे जरी खरं असलं तरीसुद्धा हिरो हा त्या चित्रपटातील खलनायकामुळेच (Villain) मोठा होता, हेसुद्धा तितकंच खरं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खुंखार विलनबद्दल सांगणार आहोत. जो रुपेरी पडद्यावर तर विलन होताच, मात्र तो त्याच्या खऱ्या आयुष्यातही विलन होता. आम्ही ज्या खुंखार विलनबाबत बोलत आहोत, त्यांचं नाव महेश आनंद (Mahesh Anand).

महेश आनंद हे 90 च्या दशकातील सर्वात भयानक खलनायकांपैकी (Mahesh Anand Is Most Terrifying Villain In 90s) एक. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पण त्यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमध्येही ते खूपच चर्चेत होते. असं म्हटलं जातंय की, त्यांचे 12 महिलांशी खुलेआम संबंध होते. त्यातील काहीजणींसोबत त्यांनी संसार थाटला, तर काहींसोबत ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. त्यांचं 5 वेळा लग्नही झालं होतं.

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होते जे खलनायक बनले आणि त्यांनी प्रेक्षकांना घाबरवलं, त्यांच्या मनात भीती निर्माण केली. पण प्रत्यक्ष जीवनात ते खूप सौम्य आणि शांत स्वभावाचे होते. पण काहींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप दुःखांचा सामना करावा लागला आणि काहींच्या नशीबी अत्यंत वेदनादायी मृत्यू आला. असाच एक अभिनेता होता महेश आनंद. एकेकाळी बॉलिवूडचा भयानक खलनायक असलेल्या महेश आनंद यांचा मृत्यू इतका वेदनादायक झाला, हे जाणून सर्वांना धक्का बसला. महेश आनंद यांनी पाच लग्न केली.

नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर... (2)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे तब्बल 12 महिलांशी अगदी खुलेआम संबंध होते, पण शेवटी मात्र ते एकटेच राहिले. जेव्हा त्यांच्या मृत्यू झाला, तेव्हा त्यांचा मृतदेह तीन दिवस घरात तसाच पडून होता, कुजत राहिलं आणि कोणीही ते घेण्यासाठी आले नाही. फक्त पाचवी बायको आली होती. येथे आम्ही तुम्हाला महेश आनंदच्या पाच पत्नींबद्दल सांगत आहोत. त्यापैकी तीन अभिनेत्री होत्या, एक मॉडेल होती आणि एक ब्यूटी पेजेंट विनर होती.

महेश आनंदची पहिली पत्नी, रीना रॉयची बहीण बरखा

महेश आनंद यांचं पहिलं लग्न अभिनेत्री रीना रॉय यांची बहीण बरखा रॉयशी झालं होतं. त्या एक फिल्म प्रोड्युसर होत्या. बरखा आणि महेश आनंद पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले, पण लवकरच त्यांचं लग्न मोडलं. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, दोघांमध्ये खूप भांडणं व्हायची. अजिबात पटायचं नाही. अखेर दोघांचा घटस्फोट झाला.

महेश आनंदची दुसरी पत्नी मिस इंडिया इंटरनॅशनल

महेश आनंद यांचं दुसरं लग्न मिस इंडिया इंटरनॅशनल एरिका मारिया डिसूझासोबत झालेलं. हे लग्न 1987 मध्ये झालं होतं. या लग्नापासून महेश आनंद त्रिशूल आनंद या मुलाचे वडील झाले. पण नंतर एरिका आणि महेश आनंद यांचा घटस्फोट झाला. नंतर मुलगा त्रिशूलनं त्याचं नाव बदलून अँथनी वोहरा असं ठेवलं. एरिकाच्या फेसबुक अकाउंटवरील माहितीनुसार, ती आता ओंटारियो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ में नर्सिंग कोर्डिनेटर आहे.

नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर... (3)

अभिनेत्री मधु मल्होत्राशी तिसरं लग्न

महेश आनंद यांचं तिसरं लग्न 80 च्या दशकातील अभिनेत्री मधु मल्होत्रासोबत झालं होतं. दोघांनीही 1992 मध्ये लग्न केलं. मधु मल्होत्रानं 'कर्ज' आणि 'सत्ते पे सत्ता' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

उषा बचानी होती महेश आनंद यांची चौथी पत्नी

महेश आनंद यांच्या चौथ्या पत्नीचं नाव उषा बचानी होतं. दोघांचंही लग्न 2000 मध्ये झालेलं, पण 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना दोन मुलं देखील आहेत. उषा बचानी ही एक प्रसिद्ध टीव्ही स्टार आहे.

महेश आनंद यांची पाचवी पत्नी रशियाची

महेश आनंद यांचं पाचवं लग्न लाना नावाच्या रशियन मॉडेलशी झालं होतं. जेव्हा महेश आनंदचा मृत्यू झाला, तेव्हा तीच त्यांचा कुजलेला मृतदेह स्मशानात अंत्यविधीसाठी घेऊन गेलेली. महेश आनंद यांनी फेसबुकवर लानासोबतचा एक फोटो शेअर केलेला आणि तिचं त्यांची पत्नी म्हणून वर्णन केलेलं.

महेश आनंदची वेदनादायक स्थिती, सावत्र भावाकडून विश्वासघात

महेश आनंद यांचं 2019 मध्ये निधन झालेलं. ते नैराश्यानं ग्रस्त होते आणि अनेक वर्षांपासून काहीच काम करत नव्हते. त्याच वेळी, त्यांच्या सावत्र भावानंही त्यांची फसवणूक केली आणि त्यांच्याकडून 6 कोटी रुपये हिसकावले. महेश आनंद यांची अवस्था अशी झाली होती की, त्याच्याकडे पाणी विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते. अभिनेत्यानं त्याच्या एका फेसबुक पोस्टमध्ये याबद्दल सांगितलं होतं.

मृतदेह आत कुजत होता, घराचा दरवाजा बंद होता

महेश आनंद यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, त्यांचा मृतदेह तीन दिवस घरात कुजत होता, पण कोणालाही काहीही कळलं नाही. कोणत्याही नातेवाईकानं किंवा कुटुंबातील सदस्यानं तिकडे पाहिलंही नाही. जेव्हा शेजाऱ्यांना महेश आनंद यांच्या घरातून दुर्गंधी येत होती, तेव्हा त्यांनी पोलिसांना बोलावलं. जेव्हा दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा महेश आनंद यांचा मृतदेह तिथेच पडला होता, जो कुजण्यास सुरुवात झाली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

नीता अंबानींचा वयाच्या साठीतही स्लीम ट्रीम फिटनेस, पर्सनल ट्रेनर विनोद चन्नाची एक तासाच्या फीचा आकडा ऐकाल तर...

Published at : 12 May 2025 09:43 AM (IST)

Tags :

ENTERTAINMENT BOLLYWOOD

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्राईम शंतनू कुकडेसोबतचे आर्थिक व्यवहार लपवण्याचा प्रयत्न, दीपक मानकर पोलिसांनाच खोटी कागदपत्रं दाखवून गंडवायला गेले पण... भारत भारतीय नौदल कोणत्याही क्षणी कराची बंदरावर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार होते: व्हाईस ॲडमिरल ए.एन. प्रमोद विश्व भारताला बलुचिस्तानच्या BLA चं जाहीर समर्थन, युद्ध झालंच तर बलुच सैन्याचा मास्टरप्लॅन, पाकिस्तानला पश्चिमेकडून घेरणार व्यापार-उद्योग लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल, अजित पवार यांनी नांदेडमध्ये संपूर्ण प्लॅन सांगितला, 30 ते 40 हजारांचं अर्थसहाय्य होणार

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 7 Photos अनुष्काने केली इंस्टाग्रामवर ही पोस्ट, आर्मीचे जवान आमच्यासाठी हिरो आहेत, विराट कोहलीने केली पोस्ट लाईक
करमणूक 9 Photos Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरेचा देसी अंदाज; साडीत दिसतेय खास!
करमणूक 8 Photos हळद लागली.. ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरच्या हळदीचे फोटो व्हायरल!

ट्रेडिंग पर्याय

नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर... (22)

अभय पाटील

CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

Opinion

नव्वदीच्या दशकातील क्रूर खलनायक, 12 महिलांसोबत खुल्लमखुल्ला रोमान्स, कोणाशी लग्न केलं, तर... (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Kimberely Baumbach CPA

Last Updated:

Views: 5575

Rating: 4 / 5 (61 voted)

Reviews: 92% of readers found this page helpful

Author information

Name: Kimberely Baumbach CPA

Birthday: 1996-01-14

Address: 8381 Boyce Course, Imeldachester, ND 74681

Phone: +3571286597580

Job: Product Banking Analyst

Hobby: Cosplaying, Inline skating, Amateur radio, Baton twirling, Mountaineering, Flying, Archery

Introduction: My name is Kimberely Baumbach CPA, I am a gorgeous, bright, charming, encouraging, zealous, lively, good person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.